Header Ads

पडळीत खळबळ! बेपत्ता विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळला

 पडळीत खळबळ! बेपत्ता विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळला.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र.

प्रतिनिधी : विजय बकरे, राधानगरी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

राधानगरी तालुक्यातील पडळी येथे बुधवारी बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचा मृतदेह गुरुवारी सकाळी शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मृत महिलेचे नाव ज्योती नारायण टिपुगडे (वय ३९, रा. पडळी, ता. राधानगरी) असे आहे. त्या बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजल्यापासून घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या पतीने राधानगरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद केली होती.

गुरुवारी सकाळी शोधमोहीम सुरू असताना पडळी येथील आनंदराव राणे यांच्या दाबाची मळी येथील शेतातील विहिरीत ज्योती टिपुगडे यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत कृष्णा शामराव टिपुगडे (वय ५३) यांनी पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिनिधी : विजय बकरे, राधानगरी

No comments:

Powered by Blogger.