"गांधीनगर पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा उत्साह; भागीरथी संस्थेतर्फे पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा."
" गांधीनगर पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा उत्साह; भागीरथी संस्थेतर्फे पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा."
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~कोल्हापूर प्रतिनिधी शशिकांत कुंभार.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी संस्थेतर्फे गांधीनगर पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. समाजात बंधुभाव आणि महिला सुरक्षा यांचा संदेश देत महिला भगिनींनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला अश्विनी जाधव, मीना गुरव, कोमल सुतार, उमा खांडेकर, अश्विनी पवार, सुनिता अनावर, सविता सुतार, पूजा कांबळे, विद्या पाटोळे आणि जयश्री तळसदे यांची उपस्थिती होती.
तसेच भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सरचिटणीस सुलोचना नार्वेकर व विशेष कार्यकारी अधिकारी यांच्यासह अनेक महिलांनी मोठ्या आनंदात रक्षाबंधन साजरे केले. कार्यक्रमात पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

No comments: