Header Ads

तालुक्यातील पोलीस पाटील यांनी गणेशोत्सव डॉल्बी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे पोलीस निरीक्षक अजित सिंध

 तालुक्यातील पोलीस पाटील यांनी गणेशोत्सव डॉल्बी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे.  पोलीस निरीक्षक अजित सिंध.

~~~±~~~~~~~~~~~~~~~~~

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

राधानगरी तालुक्यामध्ये गणेश उत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी पोलीस पाटील यांनी प्रयत्न करावेत असे आव्हान राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित सिंध यांनी तालुक्यातील पोलीस पाटील यांची बैठक राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये आयोजित केली होती या बैठकीत करण्यात आले

तसेच तालुक्यातील पोलीस पाटील यांनी नागरिकांच्या डोळ्याला व आरोग्यास अपायकारक ठरतील असे लेझर व अतितीव्र लाईट शो टाळण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच तालुक्यातील पोलीस पाटील यांनी मंडळांना परवानगी घेऊन कार्यक्रम करण्यासाठी सूचना देण्यात यावी व कोणत्याही मंडळांनी शक्तीने वर्गणी व देणगी गोळा करू नये याकडे पोलीस पाटील लक्ष देणे गरजेचे तसेच प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेचे व ध्वनी प्रदूषण संदर्भातील नियमाचे काटेकोर पालन करावे असा सूचना देण्यात याव्यात तालुक्यातील गणेशोत्सव सण शांततेने व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस पाटील यांनी पोलीस प्रशासन आवश्यकता ते सहकार्य करावे अशा सूचना पोलीस पाटील बैठकीत पोलीस निरीक्षक अजित सिंध यांनी दिल्या आहेत

या पोलीस पाटील बैठकी तालुक्यातील पोलीस पाटील व पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते

No comments:

Powered by Blogger.