Header Ads

आमशी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

 आमशी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.

~~~~~~~~~~~~~~~~~

कळे प्रतिनिधी साईश मोळे

९५९५३१६२६६.

~~~~~~~~~~~~~~~~~~

कळे:-श्री सत्य साई सेवा संघटना कोल्हापूर व लायन्स नेत्र रुग्णालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आमशी, ता. करवीर येथे दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

हे शिबिर ग्रामपंचायत आमशी येथे घेण्यात आले. यावेळी एकूण ८२ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४९ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले असून त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथे पाठवण्यात आले आहे.

या शिबिराचा लाभ खाटांगळे परिसरातील १२ वाड्यांमधील गरजू रुग्णांना झाला असून नागरिकांनी शिबिराला चांगला प्रतिसाद दिला.

यावेळी संघटनेचे परशुरामनगर समिती प्रमुख तानाजी पाटील, खाटांगळे समिती प्रमुख भगवान जांभळे, तसेच शिवाजी पाटील, बळीराम पाटील, प्रकाश परिट आणि आमशी येथील युथ सदस्य संदीप पाटील व सरदार पाटील उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.