पर्यावरण रक्षणाचा अनोखा वसा : ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमात आता पत्रावळ्यांऐवजी वापरणार स्टीलची ताटे; लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न!
पर्यावरण रक्षणाचा अनोखा वसा : ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमात आता पत्रावळ्यांऐवजी वापरणार स्टीलची ताटे; लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~सिद्धार्थ कदम पुसद तालुका प्रतिनिधी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पुसद :- पुसद उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच शहरातील बेघर व गरजू घटकांसाठी गेली १० वर्षे अविरत अन्नदानाची सेवा देणाऱ्या माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशने आता पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक अत्यंत आदर्श आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. अन्नदानादरम्यान होणारा मोठा खर्च आणि कागदी पत्रावळ्यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेऊन संस्थेने आता पत्रावळ्यांचा वापर पूर्णपणे थांबवून स्टीलच्या ताटांचा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.दात्याच्या उपस्थितीत या साहित्याचा लोकार्पण सोहळा आज,२७ ऑगस्ट २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय येथील ‘माणुसकीची भिंत मदत केंद्र’ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी देशोन्नतीचे पत्रकार ललित सेता हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून पुसद नगर परिषदेच्या अध्यक्षा मोहिनी इंद्रनील नाईक हया होत्या. सप्त खंजिरी वादक तसेच माणुसकीच्या भिंतीचे मार्गदर्शक पंकजपाल महाराज,सौ मिलन भेलोंडे अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पुसद,प्रा. प्रेम राठोड,अमित प्रजापती ईश्वर ठाकूर इत्यादी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांच्या पूजनाने या कार्यक्रमाची सुरवात झाली.भिंतीच्या या सामाजिक कार्यामध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था सौ.मोहिनी ताई नाईक यांनी केली.अमित प्रजापती यांनी पाणी साठविण्या करिता पाण्याची टाकी व फिटिंग करिता येणारा संपूर्ण खर्च केला. प्रा.प्रेम राठोड दारव्हा यांनी पाण्याच्या टाकीच्या स्टॅन्डची व्यवस्था केली. ईश्वर ठाकूर यांनी स्टीलची ताटे धुण्याकरिता स्टील च्या बेसिन ची व्यवस्था केली. तर मोहिनी नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कौस्तुभ धुमाळे सर यांनी स्टीलच्या 150 ताटाची व्यवस्था केली.या सर्व मान्यवरांचा शाल,एक झाड, व सन्मानचिन्ह देऊन सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून सर्व साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.मोहिनी नाईक यांनी आपल्या भाषणात माणुसकीची भिंतीच्या कार्याचा गौरव केला.कार्यक्रमाचे प्रस्तविक सप्त खंजीरी वादक व प्रबोधनकर पंकजपाल महाराज यांनी केले तर संचलन व आभार प्रदर्शन मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रमेश डंबोळे यांनी केले या प्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते.
अॅड.नितीन जाधव, संभाजीराव टेटर,स्वप्निल देशमुख,गणेश धर्माळे,नयन रामधनी,सुरेश लव्हाळे,रुग्ण मित्र फाउंडेशनचे शांतीसागर इंगोले,माणुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव,अनंता चतुर,मधुकर चव्हाण,अमित हटवार,अरुण नागुलकर, दिगंबर देशमुख, मंगेश भगत, पंजाबराव ढेकळे,संतोष गावंडे, प्रमोद ठाकूर,आदित्य जाधव, क्रिश आगलावे,ऋषिकेश पंडितकर, डॉ.अतुल रुणवाल, तसेच संस्थेच्या महिला सदस्या मोनिका जाधव,कामिना चतुर, रेखा आगलावे,पूजा इंगोले, अर्चना गावंडे गणेश पवार, करण ढेकळे यांच्यासह बहुसंख्य नागरिक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम पुसद शहरात कौतुकाचा विषय ठरला असून सर्व स्तरांतून संस्थेचे व दात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.

No comments: