कोल्हापुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई; ४३२ केसेस अंतर्गत ३.८ लाख रुपयांचा दंड वसूल
कोल्हापुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई; ४३२ केसेस अंतर्गत ३.८ लाख रुपयांचा दंड वसूल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~कोल्हापूर:शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर तर्फे आज (दिनांक २०.०८.२०२६) शहरातील विविध प्रमुख महाविद्यालये आणि चौकांमध्ये विनापरवाना व नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांवर एक विशेष धडक मोहीम राबवण्यात आली. सकाळी १०.३० ते १२.३० या अवघ्या दोन तासांच्या कालावधीत करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण ४३२ केसेस नोंदवून ३,८०,८५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम महावीर कॉलेज, विवेकानंद कॉलेज, शहाजी कॉलेज, गोखले कॉलेज, सायबर चौक आणि खरी कॉर्नर या ठिकाणी राबवण्यात आली. यामध्ये अल्पवयीन वाहन चालक, ट्रिपल सीट फिरणारे हुल्लडबाज, सायलेन्सर बदलून आवाज करणारे आणि कर्कश हॉर्न वाजवणाऱ्या वाहनधारकांना टार्गेट करण्यात आले.
कारवाईचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे:
लायसन जवळ न बाळगणे: सर्वाधिक १८८ केसेस (दंड ₹१४,०००)
विहीत नमुन्यात नंबर प्लेट नसणे: ७७ केसेस (दंड ₹५,५००)
तिब्बल (ट्रिपल) सीट वाहन चालवणे: ३१ केसेस (दंड ₹३१,०००)
वाहन चालवताना मोबाईलचा वापर: २७ केसेस (दंड ₹३६,०००)
लायसन्स न काढणे व* *अल्पवयीन*पालकांवर कारवाई: ११ केसेस (दंड ₹५५,०००)
इतर केसेस: ९४ केसेस (दंड ₹६१,३५०)
फॅन्सी नंबर प्लेट: २ केसेस (दंड ₹२,०००)
वाहनांमध्ये मॉडिफिकेशन करणे: २ केसेस (दंड ₹२,०००)
*वया धडक कारवाईमध्ये* *उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, पोलीस उप-अधीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते*. वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No comments: