Header Ads

मिरज-पंढरपूर मार्गावर एलसीबीची कारवाई; 300 किलो गांजासह कंटेनर चालक ताब्यात.

 मिरज-पंढरपूर मार्गावर एलसीबीची कारवाई; 300 किलो गांजासह कंटेनर चालक ताब्यात.

---------------------------------------

सांगली | प्रतिनिधी

 राजू कदम 

---------------------------------------


सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मिरज-पंढरपूर महामार्गावर कारवाई करत सुमारे 300किलो गांजा जप्त केला असून कंटेनर चालक मंगेश मोरे (रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) याला ताब्यात घेतले आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने तानंग फाटा-मालगाव रस्त्यावर छापा टाकला. NL-01-AD-9366 क्रमांकाच्या कंटेनरच्या ड्रायव्हर केबिनमधील कप्प्यातून १५० पॅकेटमध्ये गुंडाळलेला गांजा आढळून आला.

आरोपीने हा गांजा ओडिशा राज्यातून आणून पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली आहे. जप्त गांजा व कंटेनर ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास एलसीबीकडून सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.