कुपवाडच्या शामनगरात स्वातंत्र्यदिनी पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला; सुरा अन् हातोड्याने वार, पत्नी गंभीर
कुपवाडच्या शामनगरात स्वातंत्र्यदिनी पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला; सुरा अन् हातोड्याने वार, पत्नी गंभीर.
कुपवाड येथील शामनगर परिसरात १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनीच एक थरारक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून एका ५२ वर्षीय इसमाने पती-पत्नीवर सुरा आणि हातोड्याने जीवघेणा हल्ला केला. या रक्तरंजित घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शामनगर येथे किरकोळ वादातून संशयित आरोपी फरीद अब्दुल शेख (वय ५२) याने मोहन केसरकर व मनिषा केसरकर या दांपत्यावर धारदार सुरा व हातोड्याने प्राणघातक हल्ला चढवला. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची आणि पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

No comments: