Header Ads

वृद्धांना लिफ्टच्या बहाण्याने लुटणारा सराईत आरोपी जेरबंद; सांगली एलसीबीने ८ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस.

 वृद्धांना लिफ्टच्या बहाण्याने लुटणारा सराईत आरोपी जेरबंद; सांगली एलसीबीने ८ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सांगली कुपवाड मिरज प्रतिनिधी राजू कदम.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वृद्ध आजी-आजोबांना मोटारसायकलवरून घरी सोडण्याचा बहाणा करून दागिने लुटणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली आहे. मारुती बयाजी कोटे (रा. हुलजंती, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) याला कुपवाडच्या चाणक्य चौकातून ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत आरोपीने मिरज, जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी परिसरातील ८ जबरी चोरीचे गुन्हे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून १४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये ९० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक मोटारसायकलचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने केली.

No comments:

Powered by Blogger.