Header Ads

श्रावण महिन्यात भाविकांसाठी एसटीची खास देवदर्शन यात्रा; गगनबावडा आगारातून विशेष बससेवा सुरू

 श्रावण महिन्यात भाविकांसाठी एसटीची खास देवदर्शन यात्रा; गगनबावडा आगारातून विशेष बससेवा सुरू.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

श्रावण महिन्यानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील गगनबावडा आगाराने भाविकांसाठी विशेष देवदर्शन बससेवा सुरू केली आहे. अष्टविनायक, ११ मारुती तसेच पंढरपूर–तुळजापूर–अक्कलकोट या धार्मिक स्थळांसाठी विशेष पर्यटन फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

गगनबावडा आगारातून अष्टविनायक दर्शनासाठी ३ दिवसांची आणि २ मुक्कामांची यात्रा २,७९५ रुपये दरात उपलब्ध आहे. ११ मारुती दर्शनाची एकदिवसीय यात्रा ९३५ रुपये, तर पंढरपूर–तुळजापूर–अक्कलकोट दर्शनाची २ दिवसांची आणि १ मुक्कामाची यात्रा १,७८० रुपये दरात आयोजित करण्यात आली आहे.

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलतीच्या प्रवाशांना नियमानुसार भाड्यात सवलत मिळणार आहे. तसेच ४० प्रवाशांचा गट असल्यास गावातूनच एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार असून ग्रुप बुकिंगला प्राधान्य दिले जाणार आहे.

एसटी महामंडळाने भाविकांना सुरक्षित, सुखकर आणि किफायतशीर प्रवासासाठी आजच बस बुक करण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Powered by Blogger.