अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पन्हाळा तालुका अध्यक्षपदी- किरण मस्कर
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पन्हाळा तालुका अध्यक्षपदी- किरण मस्कर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~कळे प्रतिनिधी साईश मोळे.
~~~~~~~±±~~~~~~~~
कळे:- मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघटनेच्या पन्हाळा तालुका अध्यक्षपदी पत्रकार किरण मस्कर यांची व उपाध्यक्ष पदी डॉ. अरुण पाटील यांची निवड करण्यात आली.
ही निवड संघटनेच्या कोल्हापूर कार्यालयात झाली. या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष नारायण सुतार, जिल्हा सचिव समाधान म्हातुगडे, कोल्हापूर- सांगली- बेळगाव जिल्ह्याचे सचिव उदयकुमार देशपांडे व महाराष्ट्र राज्य राज्य कार्यकारिणीचे सदस्य अनिल दुबदाळे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी सांगली येथे ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. यावेळी फ्रट लाईन न्यूज महाराष्ट्र चे पत्रकार सुनिल मोळे, पत्रकार सुरज चौगुले, शिवाजी नांगरे, दशरथ खुटाळे,धनाजी थोरात यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल किरण मस्कर यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments: