Header Ads

मलकापूर अर्बनची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न: सभासदांना ११ टक्के लाभांश

 मलकापूर अर्बनची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न: सभासदांना ११ टक्के लाभांश.

~~~~~~~~~~~±~±±~~~~~~

मलकापूर प्रतिनिधी :  रोहित पास्ते 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

  सभासदांचे हित जपून पारदर्शक कारभारामुळे मलकापूर अर्बनने ठेवीमध्ये उच्चांकी टप्पा ओलंडला असल्याचे मत चेअरमन अजय लोध यांनी केले. मलकापूर ता.शाहूवाडी येथील मलकापूर अर्बनच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अजय लोध पुढे म्हणाले की, संस्थेने १६७ कोटीच्या ठेवीचा टप्पा ओलांडला आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय २९१ कोटीच्या वर झाला आहे. आतापर्यंत जसा संस्थेवर आपण विश्वास ठेवला तसाच यापुढे देखील विश्वास ठेवावा असे आवहन त्यांनी केले. जिल्हा बँकेचे माजी संचालक व जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील सहकारात आदर्श संस्था म्हणून मलकापूर अर्बन ची वाटचाल सुरू आहे. यामध्ये ठेवीदार, कर्जदार, संस्थेचे हितचिंतक यांची देखील भूमिका महत्त्वाची आहे. अहवाल वाचन जनरल मॅनेजर राजेंद्र जोशी यांनी केले. सभासदांच्या वतीने शंतनू कोठावळे, सिद्धेश कोळेकर, सुभाष पवार  व  ज्येष्ठ सभासदांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांनाची उत्तरे चेअरमन अजय लोध, संचालक सर्जेराव पाटील, अमोल केसरकर यांनी दिली.

 संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ सभासद यांचा गौरव करण्यात आला. सभेस व्हाय. चेअरमन गिरीश बाष्टे संचालक गुलाब भटारी, माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, अतुल भिंगार्डे, राजेंद्र कोठावळे,संजय भोपळे, सागर पाटील,भीमराव सनगर, रवींद्र पाथरे, प्रसाद वळीवडेकर, नंदकुमार कोठावळे, सौ.रजिता वारंगे, राजश्री मगर तसेच दिलीप चौगुले, वसुली अधिकारी संजय बसरे आदीसह सभासद सर्व शाखेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आभार संचालक बाळासाहेब गद्रे यांनी मानले.

No comments:

Powered by Blogger.