Header Ads

४०२ वाहन चालकांवर कारवाई; ३ लाख ८ हजार रुपयांचा दंड वसूल

 ४०२ वाहन चालकांवर कारवाई; ३ लाख ८ हजार रुपयांचा दंड वसूल


~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिनिधी रहिम पिंजारी.

~~~~~~~~~~~~~~~~

कोल्हापूर शहरातील महावीर कॉलेज, विवेकानंद कॉलेज, शहाजी कॉलेज, गोखले कॉलेज, सायबर चौक आणि खरी कॉर्नर या ठिकाणी विशेष मोहीम राबवून ४०२ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून ३,०८,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

ही कारवाई आज सकाळी १०:३० ते १२:३० आणि सायंकाळी १७:०० ते १८:३० या वेळेत करण्यात आली. यामध्ये अल्पवयीन वाहन चालक, ट्रिपल सीट वाहन चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्णकर्कश हॉर्न वाजवणाऱ्या हुल्लडबाजांना लक्ष्य करण्यात आले.

कारवाईचा सविस्तर तपशील:

अ.नं. उल्लंघनाचा प्रकार केसेस संख्या दंड (रुपये)

ट्रिपल सीट (तिब्बल सीट) २२ २२,०००

वाहन चालवताना मोबाईलचा वापर १६ २५,०००

विहीत नमुन्यात नंबर प्लेट नसणे ४४ ३६,०००

फॅन्सी नंबर प्लेट १,५००

वाहनामध्ये मॉडिफिकेशन करणे ३,०००

सिग्नल जंप करणे ४८ २८,०००

लायसन्स जवळ न बाळगणे १०९ ७४,५००

लायसन्स न काढणे २०,०००

प्रवेश बंद मार्गातून वाहन चालविणे ३८ २४,०००

१० कर्कश हॉर्न ७,५००

११ इतर केसेस १०७ ६६,५००

एकूण ४०२ ३,०८,०००

प्रमुख अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये शाहूपुरी पो. ठाण्याचे पोनि संतोष डोके, लक्ष्मीपुरी पो. ठाण्याचे पोनि श्रीराम कन्हेरकर, राजारामपुरी पो. ठाण्याचे पोनि विकास जाधव, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोनि किरण लोंढे, तसेच शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

No comments:

Powered by Blogger.