Header Ads

जयभीम क्रांती सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह रक्षाबंधन सोहळा उत्साहात

 जयभीम क्रांती सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह रक्षाबंधन सोहळा उत्साहात

मिरजेत संघटनेच्या बैठकीत विविध पदांवर नियुक्त्या; महिला आघाडीतील बहिणींना साडी भेट देत रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम.

~~~~~~~~~~~~~~~~~~

मिरज | प्रतिनिधी राजू कदम.

~~~~~~~~~~~~~~~~~~~

जयभीम क्रांती सेनेच्या वतीने संघटनेच्या नूतन पदाधिकारी निवडीची बैठक तसेच महिला आघाडीतील कार्यरत बहिणींसाठी रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मिरजेतील गणेश थाळी हॉल येथे सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी संस्थापक अध्यक्ष गॅब्रियलभाऊ तिवडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी संघटनेच्या आगामी वाटचालीला बळ देण्यासाठी विविध पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी तानाजी सावंत, महिला युवती आघाडी जिल्हाध्यक्षपदी पायल पाटील, तासगाव शहराध्यक्षपदी सुशांत देवकुळे, लोकसभा क्षेत्राध्यक्षपदी अभय मोरे, तर पलूस तालुका कार्याध्यक्षपदी गुरुनाथ धाबडे यांची निवड करण्यात आली. याशिवाय महिला आघाडीसह इतर पदांवरही नियुक्त्या करण्यात आल्या.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करून त्यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेची भूमिका तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून सामाजिक प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

महिला आघाडीच्या बहिणींसाठी रक्षाबंधनाचा विशेष उपक्रम

बैठकीसोबतच जयभीम क्रांती सेनेच्या महिला आघाडीतील कार्यरत सर्व बहिणींसाठी विशेष रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला आघाडीच्या बहिणींनी संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रेमाने राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.

No comments:

Powered by Blogger.