Header Ads

सांगलीत साखरेच्या साठ्यावर केंद्रीय व जिल्हा पथकाची धडक तपासणी,साखरेचे दर घटले; साठेबाजी रोखण्यासाठी तपासणी मोहीम सुरूच राहणार

 सांगलीत साखरेच्या साठ्यावर केंद्रीय व जिल्हा पथकाची धडक तपासणी,साखरेचे दर घटले; साठेबाजी रोखण्यासाठी तपासणी मोहीम सुरूच राहणार.


मिरज-कुपवाड | प्रतिनिधी राजू कदम.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सांगलीत :- साखर दरात अचानक वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर साठेबाजीला आळा घालण्यासाठी आणि बाजारातील साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्रीय व जिल्हा पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकाने सांगली शहरात धडक तपासणी मोहीम राबवली. गणपती पेठ तसेच मार्केट यार्ड परिसरातील विविध दुकाने आणि गोदामांची अचानक तपासणी करून साखरेच्या साठ्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष आणि अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

या विशेष तपासणीदरम्यान नियमानुसार कोठेही चार हजार क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा आढळून आला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यापूर्वीही सांगली व मिरज शहरातील विविध ठिकाणी साखरेच्या साठ्याची तपासणी करण्यात आली आहे.

या संयुक्त पथकात एफसीआयचे व्यवस्थापक जन्मजय सिंग, फूड अॅण्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशनचे सहाय्यक संचालक योगेश्वरुरु बोया, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, साखर विभागाच्या लेखापरीक्षक शीतल चौथे आणि पुरवठा निरीक्षक राजू कदम यांचा समावेश होता.

प्रशासनाकडून सुरू असलेल्या या कडक तपासणीमुळे बाजारातील साखरेचे वाढलेले दर आता कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, साठेबाजांवर वचक कायम ठेवण्यासाठी आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ही तपासणी मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रत्येक शुक्रवारी साखरेच्या साठ्याची माहिती देणे बंधनकारक



No comments:

Powered by Blogger.