Header Ads

ओतूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; साडेसहा लाखांचे २५ गहाळ मोबाईल शोधून मालकांना परत केले.

 ओतूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; साडेसहा लाखांचे २५ गहाळ मोबाईल शोधून मालकांना परत केले.

~~~~~~~~~~~~~~~~~
कैलास बोडके.
~~~~~~~~~~~~~~~~~

आळेफाटा (प्रतिनिधी ):ओतूर (ता. जुन्नर )पोलीस स्टेशन हद्दीत विविध ठिकाणांहून गहाळ झालेल्या तब्बल २५ महागड्या मोबाईलचा शोध घेण्यात ओतूर पोलिसांना यश आले आहे. या मोबाईलची एकूण किंमत सहा लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या काही दिवसांत २५ मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी मोबाईल धारकांनी दिल्या होत्या. या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत पोलिसांनी गहाळ मोबाईलचा तांत्रिक तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून हे सर्व २५ मोबाईल हस्तगत केले.

 दि. २ सप्टेंबर रोजी जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी  धनंजय पाटील यांच्या हस्ते सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना पोलीस ठाण्यात बोलावून सुपूर्द करण्यात आले. आपले हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांना सुखद धक्का बसला असून त्यांनी ओतूर पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  संदिपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या सूचनेनुसार ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, बाळशिराम भवारी,  धनंजय पालवे, आशिष जगताप यांच्या पथकाने  केली आहे.

No comments:

Powered by Blogger.