२२ लाखांना व्हेंटिलेटर खरेदीचा आरोप; जीएमसी अमरावतीतील कथित घोटाळ्यावर डॉ. सुनील देशमुखांचा गंभीर सवाल
२२ लाखांना व्हेंटिलेटर खरेदीचा आरोप; जीएमसी अमरावतीतील कथित घोटाळ्यावर डॉ. सुनील देशमुखांचा गंभीर सवाल.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अमरावतीच्या शासकीय डफरीन रुग्णालयातील कथित गैरव्यवहारांचे प्रकरण ताजे असतानाच आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) अमरावतीतील व्हेंटिलेटर खरेदीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. माजी पालकमंत्री तथा माजी अर्थ व नियोजन मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी व्हेंटिलेटर खरेदीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
डॉ. देशमुख यांच्या आरोपानुसार, मूळ किंमत सुमारे १३.१२ लाख रुपये (जीएसटीसह) असलेले Hamilton C3 व्हेंटिलेटर तब्बल २२.५५ लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. म्हणजेच प्रत्येक व्हेंटिलेटरमागे जवळपास ९ लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आरोपातील महत्त्वाचे मुद्दे,
Hamilton C3 कंपनीचे व्हेंटिलेटर अधिकृत वितरकाकडून न घेता वाशिम येथील **निर्मल एजन्सी**मार्फत खरेदी करण्यात आल्याचा आरोप.२० व्हेंटिलेटरचा पुरवठा सुमारे ४.५० कोटी रुपयांचा करण्यात आला. पुरवठादाराचा दिलेला पत्ता तपासला असता तेथे व्हेंटिलेटर एजन्सीऐवजी किराणा व मसाल्याचे दुकान आढळल्याचा दावा.त्यामुळे संपूर्ण खरेदी प्रक्रिया संशयास्पद असल्याचे डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे.
“आंधळा दळतोय आणि कुत्रं पीठ खातंय”
या प्रकरणावर टीका करताना डॉ. सुनील देशमुख यांनी आरोग्य विभागातील भ्रष्टाचारावर संताप व्यक्त केला. “कोणीही वर बसून पैसे खातं आणि निघून जातं. ही मनोवृत्ती वाढीस लागली आहे. महानगरपालिकेतील काही निर्णयांप्रमाणेच आरोग्य विभागातही गंभीर गैरव्यवहार होत आहेत,” असे त्यांनी म्हटले.
चौकशीची मागणी.
~~~~~~~~~~~~~
व्हेंटिलेटर खरेदीतील किंमतीतील मोठी तफावत, पुरवठादाराची पात्रता आणि संपूर्ण खरेदी प्रक्रियेची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्याची मागणी डॉ. देशमुख यांनी केली आहे.

No comments: