Header Ads

मराठा आरक्षण : सरकार आपल्या शब्दापासून मागे हटणार नाही.

 मराठा आरक्षण : सरकार आपल्या शब्दापासून मागे हटणार नाही.


---------------------------------

सातारा | प्रतिनिधी 

अमर इंदलकर

---------------------------------

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे यांना दिलेल्या शब्दापासून राज्य सरकार मागे हटणार नाही. तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, याची शासन काळजी घेत असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.


राज्यात आढळलेल्या सुमारे ५८ लाख मराठा-कुणबी नोंदींच्या याद्या ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात प्रसिद्ध करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


मात्र, संबंधित व्यक्तींना दाखले देताना विहित प्रक्रिया पाळावी लागणार आहे. अर्जानंतर स्थानिक चौकशी, वंशावळ जुळविणे आणि आवश्यक पडताळणी समितीमार्फत तपासणी केली जाणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.


मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठका सुरू असून, या विषयाचा दर आठवड्याला आढावा घेतला जात आहे. कागदपत्रांची प्रक्रिया आणि विभागनिहाय कामकाजाचा अहवालही घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान, अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि तातडीने औषधोपचार सुरू करावेत, अशी कळकळीची विनंतीही देसाई यांनी केली.

No comments:

Powered by Blogger.