एनडीपीएस गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक ; स्थानिक गुन्हे शाखा व जुन्नर पोलिसांची संयुक्त कारवाई
एनडीपीएस गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक ; स्थानिक गुन्हे शाखा व जुन्नर पोलिसांची संयुक्त कारवाई
जुन्नर / कोंढवा (पुणे) :* जुन्नर पोलीस स्टेशन येथील एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व जुन्नर पोलिसांनी कोंढवा, पुणे येथून ताब्यात घेतले आहे.
जुन्नर पोलीस स्टेशन एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी निखिल नितीन परदेशी (वय 21, रा. प्लॅटिनम हॉटेल जवळ, जुन्नर) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भोकरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी कोंढवा परिसरात येणार आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने जुन्नर पोलीस स्टेशनच्या मदतीने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्यास पुढील कारवाईसाठी जुन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, जुन्नरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भोकरे, दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे तसेच जुन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे,लांडगे, भागवत यांनी केली आहे .

No comments: