Header Ads

कुपवाड एमआयडीसीत ३० वर्षीय तरुणाची आत्महत्या; परिसरात खळबळ

 कुपवाड एमआयडीसीत ३० वर्षीय तरुणाची आत्महत्या; परिसरात खळबळ

इंडेन गॅस गोडाऊनच्या मोकळ्या जागेत झाडाला गळफास घेत जीवन संपवले; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट.


कुपवाड | मिरज प्रतिनिधी : राजू कदम

कुपवाड : कुपवाड एमआयडीसी परिसरात एका ३० वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर २०२६) सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चंद्रकांत राजू कांबळे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. कुपवाड एमआयडीसी परिसरातील इंडेन गॅस गोडाऊनच्या मोकळ्या जागेत झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस आणि आयुष्य हेल्पलाइन टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

दरम्यान, संबंधित तरुणाने आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी कुपवाड पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, तपासानंतरच घटनेबाबत अधिक माहिती समोर येणार आहे.

No comments:

Powered by Blogger.