सामाजिक कार्याची दखल! धोंडीराम धुमाळे यांची प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शिरोळ तालुका उपाध्यक्षपदी निवड!
सामाजिक कार्याची दखल! धोंडीराम धुमाळे यांची प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शिरोळ तालुका उपाध्यक्षपदी निवड!
दिव्यांग बांधवांसाठी केलेल्या कार्याचा सन्मान; नियुक्तीपत्र देऊन पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव.
दतवाड | प्रतिनिधी – अर्जुन धोंडीराम धुमाळे
दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले श्री. धोंडीराम कल्लाप्पा धुमाळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शिरोळ तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. देवदत्त माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिरोळ तालुकाध्यक्ष मा. श्री. सईद पिरजादे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. देवदत्त माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिरोळ तालुकाध्यक्ष मा. श्री. सईद पिरजादे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.
धोंडीराम धुमाळे यांनी दतवाड परिसरात सामाजिक कार्यासोबतच दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काम करण्याची धडपड दाखवली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्यावर तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
यावेळी त्यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करून उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक आणि संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या निवडीमुळे दतवाड परिसरातून त्यांचे अभिनंदन होत असून, दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून संघटनेचे कार्य अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

No comments: