Header Ads

कोल्हे मळ्यात घरात आढळला धामण जातीचा साप; सर्पमित्र श्रेयस धुमाळे व प्रतीक कांबळे यांनी केले सुरक्षित रेस्क्यू!

 कोल्हे मळ्यात घरात आढळला धामण जातीचा साप; सर्पमित्र श्रेयस धुमाळे व प्रतीक कांबळे यांनी केले सुरक्षित रेस्क्यू!

मजरेवाडी प्रतिनिधी : अर्जुन धोंडीराम धुमाळे

मजरेवाडी : शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी कोल्हे मळा, वडार वस्ती, मजरेवाडी येथील अक्रम कोल्हे यांच्या घरी धामण जातीचा साप आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घरामध्ये साप आढळल्याची माहिती मिळताच सर्पमित्र श्रेयस धुमाळे आणि प्रतीक कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने धामण जातीच्या सापाचे सुरक्षित रेस्क्यू केले.

साप दिसताच त्याला मारण्याऐवजी सर्पमित्रांना बोलावून सहकार्य केल्याबद्दल अक्रम कोल्हे यांचेही कौतुक होत आहे. सर्पमित्र श्रेयस धुमाळे आणि प्रतीक कांबळे यांनी दाखवलेली तत्परता, धाडस आणि निसर्गप्रेम यामुळे एका बिनविषारी सापाचे प्राण वाचविण्यात यश आले.

धामण हा बिनविषारी साप असून तो पर्यावरणातील उंदीर नियंत्रणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे नागरिकांनी साप दिसल्यास घाबरून न जाता त्याला मारू नये किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये. प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घ्यावी.

सर्पमित्रांचे कार्य केवळ साप पकडण्यापुरते मर्यादित नसून, वन्यजीवांचे संरक्षण आणि समाजात जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण काम आहे.


🌿 साप वाचवा, निसर्ग वाचवा!


जीवसृष्टीचे रक्षण हीच खरी सामाजिक बांधिलकी!


सर्पमित्र श्रेयस धुमाळे व प्रतीक कांबळे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.