दत्तवाड ते श्रीक्षेत्र मंगसुळी पायी वारीची अखंड परंपरा; सलग १२ वर्षांपासून भक्तिमय उपक्रम सुरू
दत्तवाड ते श्रीक्षेत्र मंगसुळी पायी वारीची अखंड परंपरा; सलग १२ वर्षांपासून भक्तिमय उपक्रम सुरू
दत्तवाड प्रतिनिधी (श्री.अर्जुन धोंडीराम धुमाळे) : गावातील प्रमुख युवा वर्गाच्या पुढाकारातून दत्तवाड ते श्रीक्षेत्र मंगसुळी अशी पायी वारी गेल्या १२ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. यंदाही आज दत्तवाड येथील युवकांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने श्रीक्षेत्र मंगसुळीकडे पायी वारीला प्रस्थान केले.
युवकांचे अशा स्थान आणि प्रेरणास्थान म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे मा. श्री रवी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यळकोट यळकोट जय
मल्हार चे भक्त सुशांत मिरजे फौजी इंडियन आर्मी, प्रमोद पाटील बाळगोणावर, संदीप पाटील चिवले छोटू, स्नेहल पाटील गिडबसा, मिरजे या सर्वांच्या सहकार्याने या वारीचे आयोजन करण्यात येते. गेल्या बारा वर्षांपासून कोणताही खंड न पडता ही धार्मिक परंपरा जपली जात आहे.या पायी वारीच्या माध्यमातून युवकांमध्ये धार्मिक भावना, एकता, बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि आध्यात्मिक विचारांची रुजवण होत आहे. गावातील युवा वर्ग एकत्र येऊन श्रद्धा आणि भक्तिभावाने हा उपक्रम राबवत असल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
दत्तवाड गावातील युवकांनी जपलेली ही बारा वर्षांची अखंड पायी वारीची परंपरा आगामी काळातही अशीच सुरू राहावी, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
बारा वर्षांची अखंड परंपरा... श्रद्धा, भक्ती आणि एकतेचा सुंदर संगम!

No comments: