Header Ads

स्कॉलरशिप परीक्षेत 19 विद्यार्थी पैकी 18 विद्यार्थी पास राज्यात नंबर वन शाळा मुख्याध्यापक अनिल चौगले.

 स्कॉलरशिप परीक्षेत 19 विद्यार्थी पैकी 18 विद्यार्थी पास राज्यात नंबर वन शाळा मुख्याध्यापक अनिल चौगले.

-------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------

शैक्षणिक वर्षांमध्ये राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे तालुका करवीर या शाळेचे 19 विद्यार्थी पैकी 18 विद्यार्थी शिष्यवृत्ती स्कॉलरशिपमध्ये पास झाले असल्याने राज्यात एक नंबर शाळा आली असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक अनिल चौगले यांनी दिली.

याअधिक माहिती आशिकी या वर्षी एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 15 विद्यार्थी पात्र तर 14 विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झाले असून त्यामध्ये कुमारी श्रुतिका कृष्णात चौगले, कुमारी गायत्री विक्रम पाटील, कुमारी गायत्री लक्ष्मण पाटील, कुमारी ॠणाली राजेंद्र पाटील या चार विद्यार्थिनींनी स्कॉलरशिप परीक्षा मध्ये पात्र झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष दिग्विजय चव्हाण सरकार, उपाध्यक्ष रघुनाथ पाटील, सचिव श्रीमती अलका पाटील, खजानिस रणजीत चव्हाण, गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील विस्तार अधिकारी विजय ओतारी, व या प्रशालेतील शिक्षक सचिन गुरव, सुदेश जाधव (स्कॉलरशिप व एन एम एम एस विभाग प्रमुख), सी. डी. पाटील, यशपाल जाधव, लिपिक सुनील भोसले, शिक्षकेत्तर विलास भाट, संजय भोई, विजय शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे मुख्याध्यापक अनिल चौगले यांनी सांगितले

No comments:

Powered by Blogger.