मिशन झिरो ड्रग्स अंतर्गत गोकुळ शिरगाव एमआयडीसी मध्ये जनजागृती.

 मिशन झिरो ड्रग्स अंतर्गत गोकुळ शिरगाव एमआयडीसी मध्ये जनजागृती. 

----------------------------

गोकुळ शिरगाव 

सलीम शेख

----------------------------

: कोल्हापूर पोलीस दलाच्या 'मिशन झिरो ड्रग्स' या मोहिमेअंतर्गत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याने गोकुळ शिरगाव MIDC मधील इंडोकाउंट आणि विलो कंपनीमध्ये अमली पदार्थ विरोधी कायद्याविषयी मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमात, उपस्थित कामगारांना अमली पदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच, कंपनी परिसरात कोणीही अमली पदार्थांची विक्री करताना आढळल्यास, तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आलं. याव्यतिरिक्त, कोल्हापूरच्या सायबर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित एक प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांमध्ये जागरूकता निर्माण केली. या पथनाट्याचे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक टि. जे. मगदूम यांनी कौतुक केले.

या जनजागृती कार्यक्रमात इंडोकाउंट आणि विलो कंपनीचे एचआर मॅनेजमेंट आणि सुमारे ४०० ते ४५० कामगार उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस सहायक निरीक्षक टि. जे. मगदूम यांच्यासह पोलीस ठाण्याचे कर्मचारी इजाज शेख, संदीप गुरव, आप्पासाहेब घाटगे आणि नितेश कांबळे उपस्थित होते. या उपक्रमामुळे 'मिशन झिरो ड्रग्स' मोहिमेला आणखी बळ मिळाले असून, कामगार वर्गात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी योग्य संदेश पोहोचला आहे.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.