विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात ध्येय ठेवावे : ज्ञानेश्वर मुटकुळे.

 विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात ध्येय ठेवावे : ज्ञानेश्वर मुटकुळे.

 ---------------------------------

मलकापूर प्रतिनिधी

 रोहित पास्ते 

---------------------------------

     विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात ध्येय ठेवून वाटचाल केल्यास यश नक्की मिळते असे प्रतिपादन आचार्य अकॅडमी बारामतीचे संस्थापक ज्ञानेश्वर मुटकुळे यांनी केले.  प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद बुद्रुक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुटकुळे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात यश मिळवण्यासाठी जिद्द आणि चिकाटी ठेवल्यास  यश नक्की मिळते हे सक्सेस ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवून दाखवून दिले आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे कष्ट आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.  शिराळा सारख्या डोंगरी भागात असणाऱ्या सक्सेस ॲकॅडमीने अल्पावधीत शिक्षण क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे. ही सर्वांसाठी  अभिमानास्पद गोष्ट आहे. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर दहावीच्या परिक्षेत प्रियदर्शिनी पाटील हीने १०० टक्के, वेदीका यादव हीने ९८.८० टक्के, सोनिया पाटील ९८.४० टक्के, अक्षरा यमगर ९८.२० टक्के, श्रेयश बुद्रुक ९८.२० टक्के, जान्हवी चव्हाण ९८ टक्के यांच्या सह दहावीचे अण्य वीस गुणवत्ता यादीतील विद्यार्थी तसेच आठवीच्या शिष्यवृत्ती, एनएमएमएस, पाचवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तुंग यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याकार्यक्रमास ॲड. नेहा सुर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा साधना पाटील, सक्सेस ॲकॅडमीचे संस्थापक वर्धमान बुद्रुक, व्यवस्थापक प्रतिभा बुद्रुक, शिक्षिक भरत बोरगे यांच्यासह सर्व शिक्षक स्टाफ, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका संध्या पाटील व दिपाली शिरसागर यांनी तर आभार भरत बोरगे यांनी मानले. 

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.