शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा- उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील.शेतकरी दिंडी प्रसंगी उबाठा उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांची मागणी.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा- उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील.शेतकरी दिंडी प्रसंगी उबाठा उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांची मागणी.
------------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
स्वरूपा खतकर
------------------------------------
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चंदगड मध्ये सुरू झालेल्या शेतकरी दिंडीचे भुदरगड तालुक्यातील वेसर्डे, कडगांव करडवाडी या ठिकाणी आल्यानंतर महिलांनी स्वागत जल्लोशी स्वागत केले. यावेळी शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यमान मुख्यमंत्री यांनी मी सत्तेवर आलो तर शेतकऱ्याना कर्जमाफी देणार अशी घोषणा केली होती पण तसे काय झालं नाही. अशा लबाड मुख्यमंत्र्याला पांडुरंगान सद्बुबुद्धी द्यावी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी घनाघाती टीका कडगांव येथे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केली.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा शेतीपंपाची शंभर टक्के वीज बिलमाफ करावी शेतकऱ्यांची पाणीपट्टी 100% माफ करावी जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर कमी करावे यासह अनेक मागण्या करत शिवसेनेची दिंडी भुदरगड मध्ये पोहोचली तर करडवाडी येथे जिल्हा संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख विजय देवने सहसंपर्कप्रमुख रियाज भाई शमणजी जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे राज्य संघटक चंगेज भाई पठाण शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण तालुका संघाचे संचालक बचाराम गुरव उप तालुका प्रमुख अशोक पाटील विभाग प्रमुख विल्सन बारदेस्कर सुनील गुरव संतोष कोटकर दत्ता गुरव केरबा सावंत सुनील मस्कर दत्तात्रय हेवाळे श्रीकांत हवंळ शेखर पोद्दार सदाशिव देसाई महादेव पाटील रमेश खतकर हिंदुराव पोवार, संदीप खतकर, रमेश जाधव, दिलीप परीट, मधुकर पोतदार, असिफ काझी, मारुती कांबळे,यांच्यासह शेतकरी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
फोटो - कडगांव येथे शेतकरी दिंडीचे स्वागत करताना शेतकरी व ग्रामस्थ
Comments
Post a Comment