सौ. मालुश्री महावीर खोत यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सौ. मालुश्री महावीर खोत यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कुपवाड : प्रभाग दोन चे भाजपाचे उमेदवार सौ.मालुश्री महावीर खोत यांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे.
--------------------------------------------
मिरज तालुका :- प्रतिनिधी राजू कदम.
---------------------------------------------
कुपवाड.महापालिकेच्या निवडणुकीसाठी कुपवाडच्या प्रभाग दोनमधील भाजपचे उमेदवार सौ. मालुश्री खोत यांनी प्रभागात प्रचाराचा जोरदार धडाका सुरू केली आहे. विरोधी गटातील उमेदवारांना सौ. मालुश्री खोत यांनी घाम फोडला आहे. त्यांच्या प्रचाराला प्रभागातून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.
विकासाचे स्वप्न उराशी बाळगून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या प्रचाराचा प्रारंभ केला. प्रभागातील मतदारांचा वाढता पाठिंबा पाहून कार्यकर्त्यांनी सौ. मालुश्री महावीर खोत.
यांचा विजय निश्चित असल्याचा कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केला त्यामुळे त्यांना मतदारांची पसंती वाढली आहे. उमेदवारांच्या स्पर्धेत सौ. मालूश्री खोत मतदारातून मोठ्या प्रमाणात सहानुभूती वाढत आहे. प्रभाग क्रमांक दोनमधून त्यांच्या प्रचार फेरीचा प्रारंभ हजरत लाडले मशायक दर्गा, महादेव मंदिर, मारुती मंदिर, रोहिदास समाज मंदिर, जैन मंदिर येथे दर्शन घेऊन करण्यात आला. ही प्रचारफेरी जैन गल्ली, लिंगायत गल्ली, स्वामी गल्ली, धनगर गल्ली, तराळ गल्ली, सिद्धार्थ नगर परिसरात काढली. या सर्व परिसरातून सौ.मालुश्री खोत यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.

No comments: