Header Ads

कुपवाड प्रभाग क्रमांक 8 प्रचारात भारतीय जनता पार्टीची लाट, प्रचारात उमेदवारांना मिळतोय अबूतपूर्व प्रतिसाद.*

 कुपवाड प्रभाग क्रमांक 8 प्रचारात भारतीय जनता पार्टीची लाट, प्रचारात उमेदवारांना मिळतोय अबूतपूर्व प्रतिसाद.* 

----------------------------------------

 मिरज तालुका :-प्रतिनिधी राजू कदम.

--------------------------------------- 


कुपवाड महानगरपालिका


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुपवाड  मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलने आक्रमक पवित्रा घेत प्रचाराचा धडाका लावला आहे. भाजपच्या चारही उमेदवारांनी प्रभागात भव्य पदयात्रा आणि रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले, ज्यामुळे प्रभागात सध्या भाजपमय वातावरण पाहायला मिळत आहे. भाजपचे अधिकृतउमेदवार दीपक कृष्ण वायदंडे, योगिता परशुराम राठोड, मीनाक्षी सदाशिव पाटील, संजय सुरगोंडा पाटील  हे 



स्वतः चारही उमेदवारांनी प्रभागातील कानाकोपऱ्यात जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर दिला आहे. 'प्रत्येक घरापर्यंत भाजपचा विचार पोहोचवण्यासाठी उमेदवार घरोघरी जात आहेत. स्थानिक नागरिकांकडूनही या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून उमेदवारांचे स्वागत केले. प्रभाग 8 मधील भाजपच्या या झंझावाती प्रचारामुळे महाविकास आघाडी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप उमेदवारांनी निर्माण केलेला प्रभाव पाहता आगामी काळात येथे मोठी राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे.


विकास प्रभागाचा आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे विश्वास पॅनेल कटीबद्ध आहे," असा उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला. येणाऱ्या दिवसांत भाजप संकेत आपला प्रचाराचा वेग आणखी वाढवणार असल्याचे मिळत आहेत. या आक्रमक प्रचारामुळे प्रभाग 8 मध्ये भाजपचे पारडे जड झाल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.