लोह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची वार्ता पोहचताच बाजारपेठ कडकडीत बंद.
लोह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची वार्ता पोहचताच बाजारपेठ कडकडीत बंद.
लोहा प्रतिनिधी
अंबादास पवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. सदरील घटनेची वार्ता लोहा शहरात पोहचताच व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्तीने बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून शोक पाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी मुंबईहून बारामती कडे येताना विमान लँड होताना विमान क्रॉश होऊन झालेल्या अपघातात अजित पवार यांच्या सह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटनेची वार्ता लोहा शहर तसेच तालुक्यात पसरताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. कांहीं क्षणात शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून शोक व्यक्त करण्यात आला. शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी देण्यात आली.
▪️चौकट
राज्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित दादा यांचे असे अचानक निघून जाणे आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले असून त्यांच्या निधनाने आम्ही पोरके झालो. दादांची उणीव आता भरून निघणे शक्य नाही.
--- राजेश पाटील बोडके
(नगरसेवक प्र. न. प. लोहा)

No comments: