Header Ads

पुस्तकांशी नातं जोडा – व्यक्तिमत्व घडवा! : आनंदराव शिंदे.

 पुस्तकांशी नातं जोडा – व्यक्तिमत्व घडवा! : आनंदराव शिंदे.

-------------------------------------

गारीवडे प्रतिनिधी  

-------------------------------------

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त बावेली (ता. गगनबावडा) येथे आयोजित सुरक्षित गाव कार्यक्रमात व्याख्याते आनंदराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांशी जवळीक वाढवण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की, सोशल मीडिया क्षणभंगुर आहे, तर पुस्तक शाश्वत आहे. त्यामुळेच पुस्तकांशी नातं जोडल्यास व्यक्तिमत्व सुदृढ व बलशाली घडते.  


 जागरूक आई-वडील हेच खऱ्या जीवनाचे स्त्रोत आहेत. पालक जबाबदार असतील तरच पुढील पिढी निर्भय, व्यसनमुक्त व संस्कारशील होते. मोबाईल व टीव्हीच्या अतिवापरामुळे घरातील संवाद हरवत चालला आहे, तो पुन्हा बळकट करण्यासाठी वडिलांनी आदर्श शेतकरी व जबाबदार पालकाची भूमिका निभावली पाहिजे.  


 विद्यार्थ्यांना व महिलांना महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक पाठ करून घेण्यात आले –  

पोलीस : १०० / ११२  

महिला हेल्पलाईन : १०९१  

चाइल्ड लाईन : १०९८  

महिला आयोग : १५२०९  

रेड अलर्ट : १८००४ १९८५८८  


राहुल सोनवणे यांनी बालविवाह, बाल तस्करी, बालमजुरी, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार व हुंडा प्रतिबंध यावर जनजागृती केली. तसेच “एका सुरक्षित गावाचा प्रकाश” ही पुस्तिका मोफत वितरित करण्यात आली.  


कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच युवराज कदम होते. स्वागत व प्रास्ताविक सायली मस्कर यांनी केले, सूत्रसंचालन गीता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी शहाजी माने यांनी केले.  


मान्यवरांमध्ये सुनिल गुरव, मुख्याध्यापक एन. डी. पाटील, पार्थ चव्हाण, उर्मिला कांबळे, सुलभा कांबळे, सविता काटे, प्रगती गुरव, गीता कांबळे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Powered by Blogger.