Header Ads

पतीच्या विरहात सोनाबाई सातपुते यांचे निधन; लोटेवाडीत हळहळ

 पतीच्या विरहात सोनाबाई सातपुते यांचे निधन; लोटेवाडीत हळहळ.



लोटेवाडी (ता. भुदरगड) येथील ज्येष्ठ नागरिक सोनाबाई गणपती सातपुते (वय ८०) यांचे नुकतेच निधन झाले. पतीच्या विरहाचे दुःख सहन न झाल्याने त्यांनीही जगाचा निरोप घेतल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

विवाह आणि जोडीदार ही साताजन्मांची सोयरिक मानली जाते. आयुष्यभर सात फेऱ्यांची गाठ बांधून सुखी संसार उभा करणाऱ्या दांपत्याचे उदाहरण म्हणून लोटेवाडीतील लोकशाहीर गणपती कृष्णा सातपुते आणि त्यांच्या पत्नी सोनाबाई सातपुते यांच्याकडे आदराने पाहिले जात होते.

लोकशाहीर गणपती सातपुते यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या कार्यामागे सोनाबाई सातपुते यांची निष्ठावान साथ आणि सेवाभाव कायम होता. वयाच्या ८६व्या वर्षी गणपती सातपुते यांचे निधन झाले. मात्र पतीच्या निधनानंतर सोनाबाई सातपुते यांना त्यांचा विरह सहन झाला नाही आणि अल्पावधीतच त्यांनीही अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बबन सातपुते, बाजीराव सातपुते तसेच सामाजिक कार्यकर्ते व लोकमतचे पत्रकार मोहन सातपुते यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Powered by Blogger.