कुपवाडमध्ये धाडसी घरफोडी! ‘सागर वाईन’ दुकानातून २.७५ लाखांची रोख रक्कम लंपास.
कुपवाडमध्ये धाडसी घरफोडी! ‘सागर वाईन’ दुकानातून २.७५ लाखांची रोख रक्कम लंपास.
---------------------------
कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
---------------------------
कुपवाड (प्रतिनिधी) – सांगली जिल्ह्यातील एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीत मध्यरात्री धाडसी घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी ‘सागर वाईन’ दुकानातून तब्बल २ लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर सुभाष माने (वय 36, व्यवसाय – व्यापार, रा. संकल्प नगर, बामनोळी ता. मिरज जि. सांगली) यांच्या मालकीचे कुपवाड येथील ‘सागर वाईन’ दुकान दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 2.00 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले.
चोरट्यांनी दुकानाच्या छतावरील पत्रा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर शटर उघडून काउंटरवरील ड्रॉवरमध्ये ठेवलेली 2,75,000 रुपयांची रोख रक्कम (500, 200, 100, 50, 20, 10 रुपयांच्या नोटा) मुद्दाम लबाडीने चोरून नेली.
या प्रकरणी गुरनं. 44/2026 भा.न्या.सं. कलम 334(1), 305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल होण्याची वेळ सायं. 5.38 वाजता अशी आहे.
घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे रात्री गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. पोलीसांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.
🔎 सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा लवकरच छडा लावला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

No comments: