Header Ads

माणकापूर येथे निसर्गराजा ग्रुपचा २१ वा ‘प्रेरणा पुरस्कार’ सोहळा उत्साहात संपन्न.

 माणकापूर येथे निसर्गराजा ग्रुपचा २१ वा ‘प्रेरणा पुरस्कार’ सोहळा उत्साहात संपन्न.

------------------------------------

बच्चे सावर्डे प्रतिनिधी

सुनिल पाटील

------------------------------------

माणकापूर (ता. निपाणी) — येथील निसर्गराजा ग्रुपच्या वतीने महाशिवरात्री, शिवजयंती व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही २१ वा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम गावातील श्री मलकारसिध्द मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पुरस्कारार्थी व निमंत्रित कवींच्या कवी संमेलनात कविता वाचन, भक्तीगीत गायन झाले. यानंतर लावणीसम्राट संदिप वनारे यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

स्वागतपर मनोगत प्रगतशील शेतकरी नंदिनीताई कदम यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय अध्यक्ष शिवाजी येडवान यांनी करून दिला. सूत्रसंचालन कवी साताप्पा सुतार यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष विठ्ठल काटकर यांनी केले. विशेष सहकार्य प्रमोदिनी माने, वंदना भंडारे, सिद्दाप्पा गावडे, रमेशकुमार मिठारे, मुकुंदराव कुलकर्णी व सुधीर पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. ह.भ.प. नारायण मोठे-देसाई होते. यावेळी अभिनेते एन.डी. चौगुले, मदन पलंगे, संभाजी साबळे, अभिनेत्री गीतांजली डोंबे, बी-न्यूजच्या वृत्तनिवेदिका पूनम चौगुले, ॲडव्होकेट बाबासाहेब निकम, संजय मुळे, डॉ. सुषमा सिद-पुजारी, उत्कृष्ट गायक सुनिल किरळे, मेडिकल ऑफिसर दिलीप पवार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी ह.भ.प. केशव पेटकर (महाराज), संदिप वनारे, पूर्वा पुजारी, मेकअप आर्टिस्ट ज्योती दंडवते व छाया धनवडे, शाहीर सागर माने व नवनाथ माने, पुनमताई सुळगावकर, तेजस्वी रेडेकर-गौंडाजे, जादूगार स्टार विलास कांबळे, शीघ्र कवी बाळासो मोहिते, कलाकार संदीप देशमुख व निखिल चव्हाण, कवी विठ्ठल जावळे, माधुरी पाटील, सुनिल माने, बाळासाहेब खोत-पाटील, सुप्रिया पाटील, पूजा भोसले, बाल कवयित्री कल्याणी भोसले, नंदा यादव यांना प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास पत्रकार राजेंद्र कांबळे, सिध्देश पाटील, लालचंद पारीक यांच्यासह निसर्गराजा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रेरणादायी उपक्रम, सांस्कृतिक सादरीकरणे व सन्मान सोहळ्यामुळे हा कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी ठरला.

No comments:

Powered by Blogger.