ट्रॅक्टर फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींला अटक नऊ लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला ठोकल्या बेड्या.
ट्रॅक्टर फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींला अटक नऊ लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला ठोकल्या बेड्या.
-----------------------------------
सातारा जावली प्रतिनिधी
शेखर जाधव
-----------------------------------
जावली तालुक्यातील टॅक्टर फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांचेकडून गुन्ह्यातील दोन ट्रॅक्टरसह नऊ लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यास मेढा पोलिसांना यश आले आहे.याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी कि, दि.16/8/2024 रोजी फिर्यादी अजित मोहन दुदुस्कर वय 40 वर्षे, शेती रा.मोरेवाडी पो.दरेखुर्द ता. जावली जि.सातारा यांच्या नावावर असलेला महेंद्रा कंपनीचा ओजा 27 एच.पी.ट्रॅक्टर क्र.एम.एच.11 डी.एन.2337 ट्रॅक्टर हा अजय संतोष चव्हाण रा. सरताळे ता. जावली जि.सातारा याने फिर्यादी यांच्याकडून ट्रॅक्टरचे हप्ते भरण्याची नोटरी करुन देवून सदर ट्रॅक्टरचे हप्ते न भरता तो ट्रॅक्टर दुस-याच कोणाला तरी देवून फिर्यादी यांचा विश्वासघात करून फसवणुक केली होती. त्याचप्रमाणे गुन्ह्यातील साक्षीदार दत्तात्रय रामचंद्र चव्हाण रा.म्हसवे ता. जावली जि.सातारा यांचा कॅप्टन कंपनीचा 283 4WD मॉडेलचा ट्रॅक्टर क्र. एम.एच.11 डी.ए.5206 असा असलेला ट्रॅक्टर फसवणूक करून घेवुन गेला असल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 26/01/2026 रोजी मेढा पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. 17/2026 भा.न्या.सं.का.2023 चे कलम 318(4),316 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा.श्री.तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, मा.सुनिल साळुंखे,उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई यांनी गुन्ह्याचे अनुशंगाने मार्गदर्शन करुन आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्याकडून फसवणुक झालेल्या व्यक्तींचे ट्रॅक्टर गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या.
त्याअनुशंगाने सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान गुन्ह्यातील आरोपी अजय संतोष चव्हाण वय-23 वर्षे, रा.सरताळे ता. जावली जि. सातारा यास दिनांक 17/02/2026 रोजी 01.29 वाजता अटक करण्यात आलेले असून त्यास मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साो, मेढा यांचे समक्ष हजर केले असता त्याला दि.21/02/2026 पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे. पोलीस कस्टडी कालावधीमध्ये त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुशंगाने विचारपुस करता त्याने फिर्यादी व साक्षीदार यांचा ट्रॅक्टर कांतीलाल अर्जुन होन रा.साई सिटी श्रीराम पार्क सी/19 कोपरगाव जि. अहिल्यानगर यांना दिलेला होता. सदरचे दोन ट्रॅक्टर 1) महेंद्रा कंपनीचा ओजा 27 एच.पी. ट्रॅक्टर क्र.एम.एच.11 डी.एन. 2337 (किंमत 5,95,000/- रुपये), 2) कॅप्टन कंपनीचा 283 4WD मॉडेलचा ट्रॅक्टर क्र. एम.एच.11 डी.ए.5206 (किंमत 3,20,000/- रुपये) हे पंचनामा करून गुन्ह्यातील फसवणुक झालेले सदरचे दोन्ही ट्रॅक्टर एकुण किंमत-9,15,000/- रुपये अशी असलेले 100% मुद्देमाल आरोपीकडून गुन्ह्याचे तपासामध्ये जप्त करणेत आलेले आहेत.
सदर कारवाई मध्ये मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कड़कर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, मा. सुनिल साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुधीर पाटील सहा. पोलीस निरीक्षक, पो.हवा. प्रमोद निकम, पो.कॉ.सनी काळे, पो.कॉ. सूरज वाघमळे, पो.कॉ. सुनिल वाघमळे, पो.कॉ. ओंकार दिक्षीत, पो.कॉ. ओंकार चव्हाण, पो. कॉ. अजय गुरव यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला आहे. मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक, मा. सुनिल साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी सदर कारवाई मध्ये सहभागी अधिकारी, अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

No comments: