नरंदे येथे सिद्धोबा डोंगरावर तरुणाचा गळफास; हातकणंगले पोलिसांत नोंद.
नरंदे येथे सिद्धोबा डोंगरावर तरुणाचा गळफास; हातकणंगले पोलिसांत नोंद.
हातकणंगले : तालुक्यातील नरंदे गावाजवळील सिद्धोबा डोंगर परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाणे येथे मयत रजिस्टर क्र. 19/2026 बी.एन.एस.एस. 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
मृताचे नाव सुरज दत्तात्रय खोत (वय 33, रा. खोतनगर, तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे आहे. याबाबत मारुती आण्णाप्पा खोत (वय 45, व्यवसाय गॅरेज, रा. खोतनगर तारदाळ) यांनी पोलीस ठाण्यात येऊन माहिती दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्यापूर्वी नरंदे गावातील सिद्धोबा डोंगर येथील दत्त मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत सुरज खोत आढळून आले. कोणत्या कारणातून त्यांनी हे पाऊल उचलले, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

No comments: