मराठी भाषेचे संवर्धन व संस्कृती जोपासण्याची गरज.
मराठी भाषेचे संवर्धन व संस्कृती जोपासण्याची गरज.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
मुख्याध्यापक हरीश संत्रे
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मराठी भाषेचे संवर्धन व संस्कृती जोपासण्याची गरज असल्याचे मत कोल्हापुरातील नागोजीराव पाटणकर हायस्कूलचे मुख्याध्यापक हरीश संत्रे यांनी संभाजीनगर एसटी आगाराच्या रंकाळा बस स्थानकावर आज मराठी भाषा दिन आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्य स्थानी संभाजीनगर एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक दयानंद पाटील हे होते
मुख्याध्यापक हरीश संत्रे पुढे म्हणाले की मराठी भाषा ही सर्व स्तरापर्यंत पोचवली पाहिजे व युवा पिढी ही मराठी भाषेतून घडवली पाहिजे असे उद्गार बोलताना व्यक्त केले
एसटी चे सर्व व्यवहार हे मराठीतूनच होत असल्याचे मत संभाजीनगर एसटी आगाराचे आगारा व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी अध्यस्थानावर बोलताना व्यक्ती केले
या कार्यक्रमास संभाजीनगर एसटी आगाराचे वाहतूक निरीक्षक अनिल सुतार आकाश सोनावले सहायक वाहतूक निरीक्षक दिलीप गावडे आगाराचे लेखाकार पृथ्वीराज साळी व एसटीचे पर्यवेक्षक कर्मचारी चालक वाहक मेकॅनिकल मोठ्या संख्येने हजर होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्वाती कापसे तर आभार आगार स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे यांनी मानले

No comments: