खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 साठी सिद्धी जाधवची पंचपदी निवड.
खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 साठी सिद्धी जाधवची पंचपदी निवड.
----------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
----------------------------------
दिनांक २५ मार्च ते १ एप्रिल २०२६ दरम्यान रायपूर (छत्तीसगड) येथे आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी कुमारी सिद्धी संदीप जाधव हिची हॉकी या क्रीडा प्रकारात पंच (रेफरी) म्हणून निवड झाली आहे.
सिद्धी जाधव हिच्या या उल्लेखनीय यशामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रात गौरव वाढला आहे. तिच्या या निवडीबद्दल क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सिद्धीला हॉकी महाराष्ट्रचे अध्यक्ष कृष्णप्रकाश (आयपीएस), हॉकी इंडियाचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट मनोज भोरे, मनीष आनंद, दिग्विजय नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच हॉकी कोल्हापूरचे पदाधिकारी मोहन भांडवले, सुरेखा पाटील, संताजी भोसले, ताहीर शेख, धीरज पाटील, सागर जाधव तसेच मार्गदर्शक संतोष चौगुले आणि राहुल गावडे यांचेही तिला मोलाचे सहकार्य मिळाले.
याशिवाय खासदार धैर्यशील माने यांनीही वेळोवेळी तिला बहुमूल्य मार्गदर्शन व सहकार्य केले आहे.
सिद्धी जाधव हिच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी व नागरिकांकडून तिचे कौतुक होत असून भविष्यातही ती अशाच प्रकारे यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

No comments: