जनार्दन पाखरे लिखित आणि निर्मीत "गजरा" लघुपट एप्रिल अखेर रसिकांच्या सेवेत.
जनार्दन पाखरे लिखित आणि निर्मीत "गजरा" लघुपट एप्रिल अखेर रसिकांच्या सेवेत.
----------------------------
कागल :-प्रतिनिधी
----------------------------
येथील जेष्ठ साहित्यीक आणि संत विभूतीचे संपादक जनार्दन पाखरे यांनी "गजरा" ही कथा लिहिली आहे. कथेचे नाट्यरूपांतर केले आहे. एरवी दुर्लक्षीत असलेला गजरा विकणारा त्याच्या जीवनात जरी वेदना, दुःख असले तरी इतरांना नेहमी आनंदीत ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. तसा तो त्याचा व्यवसाय असला तरी त्यामध्ये भावनांची गंतवणुक असते. हे लेखक जनार्दन पाखरे यांनी रेखाटले आहे.
या लघुपटामध्ये नवोदित कलाकार संदेश कांबळे, प्रियांका सुतार, प्रकाश पोतदार, सौमित्र कागलकर, धोंडीराम चौगुले, स्वराज चौगुले निर्माते जनार्दन पाखरे आहेत. तर सहकलाकार हिंदूराव कुराडे, साताप्पा हेगडे, बाबसो कवठे, अश्विनी लोहार, ज्योती घाटगे आणि स्वामी समर्थांच्या भूमिकेत सुभाष जकाते आहेत. छायाचित्रण दिलीप मुळीक तर दिग्दर्शक पॉल सोनुले आणि सहा. दिग्दर्शक किरण मुळीक आहेत.
गजरा लघुपट एप्रिल अखेर सोशल मिडीयावर प्रसारित होणार आहे. या लघुपटाचे चित्रीकरण कागल शहरात झाले आहे. लेखक व निर्माते पाखरे यांनी नवोदित कलाकारांना खुप मोठी संधी दिलेली आहे. त्यांनी यापुर्वी ऐतिहासिक तसेच कौटूंबिक नाटकाची सी.डी. प्रसारीत केलेली आहे.

No comments: