Header Ads

ठिकपूर्लीच्या उपसरपंच पदी शिल्पा लोकरे यांची निवड.

ठिकपूर्लीच्या उपसरपंच पदी शिल्पा लोकरे यांची निवड.

------------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी 

श्री युवराज पोवार 

------------------------------------

    ठिकपूर्ली ता. राधानगरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिल्पा सचिन लोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रल्हाद पाटील होते. उपसरपंच सागर शामराव ढेरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदावरती सौ शिल्पा लोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली.

        ठरलेल्या समझोत्या त्यानुसार सागर ढेरे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर शिल्पा लोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लोकरे यांचा ग्रामपंचायतीमध्ये गावातील गटप्रमुखांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

     दत्तात्रय पाटील यांनी सौ शिल्पा लोकरे यांचे नाव सुचवले तर प्रवीण भिऊंगडे यांनी त्याला अनुमोदन दिले. 

   निवडीवेळी सदस्य अर्चना पाटील, अंजना पाटील, राजश्री संकपाळ, सुनीता महाळुंगेकर, सदस्य दत्तात्रय पाटील,आनंदा चौगले,पोलीस पाटील सीमा कांबळे विठलाई ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख मान्यवर विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत ग्रामसेवक एन एस पाटील यांनी केले तर आभार सचिन लोकरे शिवाजी साठे यांनी मानले.

No comments:

Powered by Blogger.