Header Ads

कासारवाडीच्या उपसरपंचपदी सुप्रिया वडिंगेकर यांची निवड

 कासारवाडीच्या उपसरपंचपदी सुप्रिया वडिंगेकर यांची निवड 

--
-------------------------

संस्कार कुंभार.

------------------------

  हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुप्रिया उत्तम वडिंगेकर यांची बहुमताने निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अच्युत खोत होते.

           कासारवाडी येथील ग्रामपंचायतीवर ज्योतिर्लिंग ग्रामविकास परिवर्तन आघाडीची सत्ता आहे या आघाडीच्या उपसरपंच निषाली पोवार यांनी आघाडीत ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला होता. या रिक्त पदासाठी लोकनियुक्त सरपंच अच्युत खोत यांनी शुक्रवारी विषेश सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विहीत वेळेत ज्योतिर्लिंग ग्रामविकास आघाडीच्यावतीने सुप्रिया उत्तम वडिंगेकर व मनिषा भाऊसो लुगडे यांचे अर्ज दाखल झाले. यावेळी सुप्रिया वडिंगेकर यांना सरपंचसहीत ६ मते मिळाली तर विरोधी मनिषा लुगडे यांना ४ मते मिळाल्याने सुप्रिया वडिंगेकर यांची बहुमताने निवड झाल्याचे अध्यक्ष अच्युत खोत यांनी जाहीर केले. यावेळी सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी आस्मा मुल्लाणी यांनी काम पाहिले.

        यावेळी माजी उपसरपंच अभयसिंह माने, माजी उपसरपंच विलास खोत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे, नेताजी वडगावकर, मारुती वडिंगेकर, सागर वडिंगेकर, तुषार वडिंगेकर, सागर निकम, संदीप पोवार, सचिन जोंधळे, शिवाजी जोंधळे, मोहन जोंधळे, सागर खोत, गणेश जोंधळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली 

No comments:

Powered by Blogger.