गगनगडावर २४ ते २६ एप्रिल दरम्यान भव्य संत सोहळ्याचे आयोजन.
गगनगडावर २४ ते २६ एप्रिल दरम्यान भव्य संत सोहळ्याचे आयोजन.
************************
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
*************************
कळे:- महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक ऐतिहासिक सुवर्णयोग येत्या २४ ते २६ एप्रिल दरम्यान येथे जुळून येणार असून या निमित्ताने भव्य दिव्य संत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ माऊली यांचा ७५० वा जन्मोत्सव, श्री भक्त शिरोमणी संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचा ६७५ वा समाधी सोहळा, तसेच तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जनक संत नारायण महाराज देहुकर यांचा ३७५ वा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
याचबरोबर आणि यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतील वारकरी, संत वंशज, संस्थान प्रमुख तसेच हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सुमारे १० तालुक्यांतील वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या भव्य सोहळ्यात कीर्तन, भजन, धार्मिक प्रवचने तसेच विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे वारकरी संप्रदायाच्या समृद्ध परंपरेचा वारसा अधिक दृढ होणार असल्याचे गगनगिरी सेवेकरी बाजीराव पाटील आसगाव यांनी कळविले आहे.

No comments: