Header Ads

कोल्हापुरात संत नामदेव शिंपी समाजातर्फे महिला दिन उत्साहात साजरा.

 कोल्हापुरात संत नामदेव शिंपी समाजातर्फे महिला दिन उत्साहात साजरा.

-------------------------------

कोल्हापूर, प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------

येथील संत नामदेव बोर्डिंगमध्ये संत नामदेव शिंपी समाजातर्फे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्या सौ. स्नेहल केतन वेल्हाळ आणि सौ. दिशा ऋतुराज शिरसागर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते व पहिल्या प्रेमाची गोष्ट चित्रपट सहल या चित्रपटाचे मुख्य दिग्दर्शक मुकुंद खुरकर यांचा सत्कार पत्रकार विजय बकरे तसेच मुख्य अभिनेता सिद्धार्थ कुबरेकर शिंपी समाजाचे अमित मायनेकर मुख्य अभिनेत्री कल्याणी अडसूळ यांचा सत्कार शिंपी समाजाच्या महिला उपाध्यक्ष सौ कोमल पिसे यांच्या हस्ते करण्यात आला

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. अलका बकरे उपाध्यक्षा सौ. कोमल पिसे, सेक्रेटरी विणावे हावळ, सौ संध्या हिरवे आणि युवा मंच अध्यक्षा सौ. पूजा वादवणे .

कार्यक्रमाला संत नामदेव शिंपी समाज महिला मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी, महिला मंडळ आणि युवा मंचचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक पसायदानाने या प्रेरणादायी सोहळ्याची सांगता झाली.

No comments:

Powered by Blogger.