निहा कोल्हापूर व व्हाईट आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने जोतिबा यात्रेत मोफत वैद्यकीय सेवा.
निहा कोल्हापूर व व्हाईट आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने जोतिबा यात्रेत मोफत वैद्यकीय सेवा.
-------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
युवराज पोवार
-------------------------------
कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा यात्रा ही जिल्ह्यातील अत्यंत मोठी आणि श्रद्धेची यात्रा असून दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी जोतिबा डोंगरावर दाखल होत असतात. या प्रचंड गर्दीत भाविकांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. याच सामाजिक जाणीवेतून न्यू इंटिग्रेटेड होमिओपॅथिक असोसिएशन (NIHA) कोल्हापूर आणि व्हाईट आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या जोतिबा यात्रेनिमित्त मोफत वैद्यकीय सेवा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत निहा कोल्हापूरचे लाईफ मेंबर्स डॉक्टर व व्हाईट आर्मीच्या स्वयंसेवकांनी एकत्र येत भाविकांना तत्पर आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पुरवली. यात्रेदरम्यान अनेक भाविकांना चालण्यामुळे थकवा, डिहायड्रेशन, चक्कर येणे, लहान-मोठ्या जखमा, तसेच बीपी, शुगर, ताप, उलट्या, पोटदुखी यांसारख्या तक्रारी जाणवत होत्या. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी अत्यंत संयमाने व सेवाभावाने रुग्णांची तपासणी करून तात्काळ औषधोपचार केले.
उन्हाची तीव्रता, प्रचंड गर्दी आणि मर्यादित साधनसामग्री असूनही या टीमने अत्यंत शिस्तबद्ध आणि समर्पित पद्धतीने सेवा बजावली. अनेक भाविकांना त्वरित उपचार मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. “सेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून समाजासाठी तो प्रेरणादायी ठरला आहे.
निहा कोल्हापूर व व्हाईट आर्मी यांच्या या संयुक्त सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. भविष्यातही अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये ही दोन्ही संघटना सक्रियपणे पुढाकार घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
निहा कोल्हापूर पदाधिकारी:
डॉ. शितल पाटील वसगडेकर – अध्यक्ष
डॉ. सचिन भावणकर – उपाध्यक्ष
डॉ. हर्षवर्धन जगताप – माजी अध्यक्ष
डॉ. चेतन गुरव – सचिव
डॉ. तुषार पांडव – सह सचिव
डॉ. रायसिंग चव्हाण – खजिनदार
डॉ. दीपक पोवार – कायदेसल्लागार
डॉ. राहुल घोलप – स्पोर्ट सेक्रेटरी
डॉ. दीपाली देसाई – कार्यकारणी सदस्य
डॉ. प्रिया पाटील – कार्यकारणी सदस्य
डॉ. मंजुषा मोरे – कार्यकारणी सदस्य
अशी माहिती डॉ. तुषार पांडव, सहसचिव, निहा कोल्हापूर यांनी दिली.
निहा कोल्हापूर परिवार

No comments: