Header Ads

सांगली : संजयनगरमध्ये तरुणाचा खून; मुख्य संशयित ४८ तासांत जेरबंद.

 सांगली : संजयनगरमध्ये तरुणाचा खून; मुख्य संशयित ४८ तासांत जेरबंद.

----------------------------------------

 मिरज तालुका प्रतिनिधी

 राजु कदम

----------------------------------------

 संजयनगर परिसरात तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणातील मुख्य संशयिताला पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. ही कारवाई संजयनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.०० ते ६.१० वाजण्याच्या सुमारास राजीवनगर कॉर्नर परिसरात सौरभ महादेव पवार (वय २२, रा. राजीवनगर, सांगली) याचा चाकू व कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी ओमकार परशुराम पाथरवट यांनी फिर्याद दिली असून संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०३ (१), ३(५) तसेच शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, पूर्वी सिगारेट ओढण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून आरोपी शाहिद समीर मुल्ला (वय २२, रा. राजीवनगर, सांगली) व त्याचा साथीदार आयान समीर भिस्ती (वय २४) यांनी संगनमताने हा खून केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारचरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश कदम व त्यांच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे शाहिद मुल्ला याला संजयनगर परिसरातून दि. ३१ मार्च रोजी पहाटे अटक करण्यात आली.

चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचा साथीदार आयान भिस्ती सध्या फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश कदम करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.