इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी.
इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी.
--------------------------------
इंदापूर प्रतिनिधी
गणेश धनवडे
--------------------------------
इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली पौर्णिमेच्या निमित्ताने गावातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची पालखीतून ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली या पालखी सोहळ्याला महादेव भजनी मंडळ निमसाखर यांनी या दिंडी सोहळ्याला अति उत्साहाने साथ दिली तसेच गावातील स्वामीभक्त महिलांनी चौका चौकातून रांगोळी काढून स्वामींच्या पालखीचे
अति उत्साहात स्वागत केले त्यानंतर पालखी मंदिरात आल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती व जप घेण्यात आला आरतीचे मानकरी श्री संतोष ज्ञानदेव पवार यांच्या हस्ते आरती
संपन्न झाली त्यानंतर श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ निमसाखर यांच्याकडे स्वामी भक्तांनी दिलेल्या देणगीतून महाप्रसाद देण्यात आला या अन्नदानासाठी विशेष सहकार्य श्री नामदेव साहेबराव अर्जुन, श्री बापूराव ज्ञानदेव कदम, श्री किरण प्रतापराव रणवरे, श्री महादेव मारुती माळी यांचे सहकार्य लाभले तसेच श्री राजेंद्र मारुती घोडे यांच्यातर्फे पालखीच्या फुलांची सजावट करण्यात आली

No comments: