नवे पारगाव, पाडळी-मानेवाडी रस्ता खड्डेमय.
नवे पारगाव, पाडळी-मानेवाडी रस्ता खड्डेमय.
~~~~~~~~~~~~~~~~
अंबप : किशोर जासूद
~~~~~~~~~~~~~~~~~
हातकणंगले तालुक्याच्या
पश्चिम विभागातील नवे पारगाव ते पाडळी या सतत वर्दळीच्या व महत्त्वाच्या मार्गावरील नवे पारगावपासून एबीपी शिक्षण समूह संस्थेपर्यंतचा सुमारे एक किलोमीटरचा रस्ता गेली पाच वर्षे प्रलंबित आहे. याशिवाय पाडळी कमान ते मानेवाडी-मनपाडळे दरम्यानच रस्ता गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित आहे. पाडळी मानेवाडी रस्त्यासाठी परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने करूनही लोकप्रतिनिधींनी व संबंधितांकडून आजवर केवळ अश्वासनेच दिल्याने हा महत्वाचा मार्गही खड्डेमय राहिला आहे. अजूनपर्यंतही कसलाच तोडगा निघाला नाही. नवे पारगाव गावातील मुख्य राज्यमार्गाला लागून एबोपी शिक्षण समूहापर्यंतच्या पाडळी रस्त्याची गेल्या पाच
१) नवे पारगाव-पाडळी रस्त्याची दुरवस्था.
वर्षांपासून अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांकडून तातडीने हा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
पाडळी, अंबप, अंबपवाडी, मनपाडळे-मानेवाडी येथील प्रवासी नागरिक, शेतकरी, व्यापारी, कामगार व विद्याध्यर्थ्यांसाठी वारणा-कोडोली परिसरातील शिक्षण, उद्योग व व्यापारासाठी जवळच्या बाजारपेठांमुळे व मनपाडळे-पारगाव या ठिकाणी असणारे समर्थ रामदास स्थापित
११ मारुतीपैकी या धार्मिक तीर्थस्थानाकडे जाण्यास सर्वात जवळचे व सोयीचा हा मार्ग असल्याने रात्रंदिवस प्रवासी वाहनधारकांची वर्दळ सुरू आहे. मार्ग खराब व प्रवासासाठी दुर्धर ठरत असल्याने सद्यस्थितीत हे मार्ग धोकेदायक बनले आहेत. राज्यभरातून समर्थ स्थापित हनुमान भक्त मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे या मार्गाचे धार्मिक दृष्ट्याही महत्त्व अधोरेखित होते. तत्कालीन काळात माजी समाज
२) पाडळी-मानेवाडी रस्ता खराब असल्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
नवे पारगाव-पाडळी प्रलंबित रस्ता प्रस्तावित असून, अधिवेशन मंजुरीनंतर लवकरच हाती घेण्यात येईल.
किरण कांबळे, सहा. अभियंता, हातकणंगले तालुका सा. बां. विभाग
कल्याणमंत्री जयवंतराव आवळे यांनी पाडळी-मानेवाडी-मनपाडळे परिसरातील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन पाडळी ते मानेवाडी हा रस्ता मार्गी लावला होता. मात्र
सध्या या रस्त्यावर नावालाही डांबर उरलेले नसून मोठमोठ्या खड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रसंगी वाहनांचे मोठे नुकसान होत असून, प्रवाशांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. कमरेचे दुखणे, छोट्या-मोठ्या अपघाताचा धोका आणि वाहतुकीतील अडथळे यामुळे प्रवासी नागरिक त्रस्त झाले आहेत. यासाठी संबंधित विभागाने तत्काळ पाहणी करून प्रलंचित
नवे पारगाव-पाडळी कमान चौक ते मानेवाडी रस्ता मार्च २०२६ जिल्हा परिषद अर्थसंकल्पामध्ये हातकणंगलेचे आमदार डॉ. अशोकराव माने यांनी समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित केला असून, रस्ता मंजूर होताच काम हाती घेण्यात येईल.
सचिन कुंभार, सहायक अभियंता
या रस्त्यांचे उत्तम प्रतीत नवीन खडीकरणासह डांबरीकरणाचे काम उत्तम प्रतीत तातडीने मार्गी लागावे, अशी मागणी परिसरातून दिवसेंदिवस जोर धरत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, संबंधित बांधकाम विभागाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही ठोस कार्यवाही झालेली नाही. संबंधितांनी संतप्त जनभावनेचा तत्काळ आदर करून हे खराब रस्ते लवकर मार्गी लावावेत.

No comments: