फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र व दैनिक सुपर भारतच्या प्रतिनिधी सौ. रजनी मयुरेश कुंभार यांचा वाढदिवस उत्साहात.
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र व दैनिक सुपर भारतच्या प्रतिनिधी सौ. रजनी मयुरेश कुंभार यांचा वाढदिवस उत्साहात.
~~~~~~~~~~~~~~~~
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
~~~~~~~~~~~~~~~~~
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र तसेच दैनिक सुपर भारतच्या कोल्हापूर महानगरपालिका प्रतिनिधी व निवेदिका सौ. रजनी मयुरेश कुंभार यांचा वाढदिवस विविध स्तरातून शुभेच्छांच्या वर्षावात उत्साहात साजरा करण्यात आला.
पत्रकारिता क्षेत्रात सक्रियपणे कार्य करत असताना सौ. रजनी कुंभार यांनी सामाजिक, सांस्कृतिक तसेच नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या कार्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या घडामोडी तसेच शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, सहकारी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, यश आणि दीर्घायुष्य लाभावे, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
या प्रसंगी अनेकांनी त्यांच्या पत्रकारितेतील कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments: