Header Ads

बोगस जात प्रमाणपत्राची चौकशी करून कारवाई करावी – रिपब्लिकन सेनेची मागणी.

 बोगस जात प्रमाणपत्राची चौकशी करून कारवाई करावी – रिपब्लिकन सेनेची मागणी

~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोल्हापूर प्रतिनिधी 

संस्कार कुंभार 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोल्हापूर, दि. २ मार्च २०२६ : दरगोंडा बसगोंडा पाटील यांनी दोन वेगवेगळ्या जातींचे प्रमाणपत्र काढून प्रशासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, दरगोंडा बसगोंडा पाटील हे मूळतः सर्वसाधारण प्रवर्गातील असताना त्यांनी २०१२ साली अनुसूचित जातीचा दाखला घेतला. त्यानंतर २०२२ मध्ये ओबीसी (तेली) जातीचा दाखला काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या जातींचे दाखले काढून शासनाची व प्रशासनाची फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या २०२६ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवरून दरगोंडा पाटील यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. याबाबत हरकत घेऊनही निवडणूक अधिकाऱ्यांनी दबावाखाली त्यांचा जात दाखला अवैध ठरवला नसल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे.

या प्रकरणामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून, संबंधितांवर तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदन देताना जिल्हाध्यक्ष बाबासो कामत, अर्जुन कांबळे, करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी, शहराध्यक्ष राज विक्रम कांबळे, महासचिव अर्जुन कांबळे, जिल्हा संघटक तानाजी काळे, सुभाष शिंगे, मनोज कांबळे, संतोष कांबळे, शुभम कामत, ईजाज नदाफ, संदीप गोंधळी, अमोल कांबळे, शिवाजी कांबळे, अशोक भोसले, पंडित कांबळे, सिताराम कांबळे, विलास कांबळे, दीपक डोणे, महादेव कांबळे, नितीन कांबळे, सर्जेराव सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.