Header Ads

निमसाखर गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा.

 निमसाखर गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा.

---------------------

 इंदापूर प्रतिनिधी.

 गणेश धनवडे.

----------------------

 इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन अति उत्साहात साजरा करण्यात आला संध्याकाळी पाच वाजता गावातून श्रींच्या पादुकांची ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली या पालखी सोहळ्यामध्ये सर्व महिला स्वामी भक्तांनी पालखी मार्गावर रांगोळी काढून अति उत्साहात स्वागत केले तसेच पालखीची सजावट श्री राजेंद्र मारुती घोडे यांनी नेहमीप्रमाणे केली होती तसेच निमसाखर गावच्या स्वामी भक्त सौ सुषमा सुनीलराव मोरे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ स्पीकर सामान  स्वामी चरणी अर्पण केले तसेच पत्रकार गणेश धनवडे यांच्यातर्फे जिलेबी चा प्रसाद वाटप करण्यात आला तसेच मंदिरातील रांगोळीची सेवा महिला स्वामीभक्त शितल सुनील टकले यांनी केली तसेच साडेसात वाजता ह.भ.प.श्री धैर्यशील भाऊ देशमुख नातेपुते यांचे स्वामी चरित्रावर प्रवचन झाले त्यानंतर श्रींच्या पादुकावर पुष्पवृष्टी करण्यात आली नंतर श्री राजाराम संभाजी जाधव यांचे तर्फे फटाकेंची आतषबाजी करण्यात आली त्यानंतर मंदिरामध्ये आरती व जप घेण्यात आला त्यानंतर श्री राजेंद्र हनुमंतराव रणवरे मुकादमवाडा यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला या कार्यक्रमासाठी आवर्जून वालचंद नगरचे स्वामीभक्त श्री राम कुंभार सर आवर्जून उपस्थित होते या सोहळ्याला निमसाखर गाव व परिसरातील सर्व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.